पेण बँकेसाठी यापुढे आंदोलन करायची गरज नाही; मुख्यमंत्र्यांचे संघर्ष समितीला आश्वासन

खोपोली : समाधान दिसले

पेण बँकेसाठी यापुढे ठेवीदारांना आणि खातेदारांना आंदोलने आणि मोर्चे काढण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी संघर्ष समितीला दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पेण बँक संघर्ष समितीने आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे.

पेण बँकेत बुडाल्यानंतर आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदार आणि खातेदार हे शासन दरबारी दाद मागत आहे. बँकेकडे जमा असलेल्या आणि बँकेच्या मालकीच्या असणाऱ्या स्थावर मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना आणि खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी संघर्ष समिती जोर धरत आहे. त्यासाठी सोमवारी संघर्ष समितीच्या वतीने वर्षा बंगल्यावर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल. आंदोलन दरम्यान मुंबई पोलिसांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. दरम्यान आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी आमदार धेर्यशील पाटील, समितीचे नरेन जाधव आणि दत्तात्रेय मसूरकर यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी यापुढे आंदोलने काढण्याची गरज नसून मी स्वतः पेण बँकेच्या ठेवीदारांना आणि खातेदारांन त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी लक्ष घालेल असे सांगितले. तसेच बँकेच्या ताब्यात असलेली आणि नावावर असलेल्या जागांची विक्री करून खातेदारांना आणि ठेवीदारांना पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत