पेण येथे समृद्ध रायगड कृषी महोत्सवाचे आयोजन

पेण : सुनील पाटील

शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने पेण येथे “समृद्ध रायगड कृषी महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदे मार्फत 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत हे महोत्सव होणार आहे.

या महोत्सवास रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहून आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत करावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी केलंय. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, बी बियाणे, कीटकनाशके, मुक्तसंचार गोठा, त्यामध्ये गाई, म्हशी, घोडे, बकऱ्या यांचा समावेश असणार असून, विविध योजना या विषयीच्या माहितीचा समावेश आहे. आगरी, कोळी समाजाच्या खाद्य संस्कृताचाही आस्वाद खवय्यांना या ठिकाणी घेता येणार आहे. पेण येथे मुंबई – गोवा महामार्गावर हाॅटेल मंथन शेजारी असलेल्या भव्य पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत