पेन्शन धारकांना दिलासा; हयात प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख वाढवली

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

पेन्शन धारकांसाठी दिलासा मोठा देणारे वृत्त समोर आले आहे. पेन्शन धारकांना वेळोवेळी हयात प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असते. मात्र आता पेन्शन धारकांना हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. पेन्शन धारकांना हयातीचा दाखला आता 28 फेब्रुवारीपर्यंत देता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं कठीण होतं. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडणं टाळलं. अशा ज्येष्ठ नागरिकांना या वृत्तामुळे दिलासा मिळालाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत