पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! जीवित असल्याचे प्रमाणपत्र पोस्टाद्वारे 31 डिसेंबरपर्यंत पाठविता येणार

भांडुप : किशोर गावडे (प्रतिनिधी)

दरवर्षी पेन्शनधारक कर्मचार्‍यांना सादर करावे लागणारे जीवित असल्याचे प्रमाणपत्र आता पोस्टाद्वारे पाठविता येणार आहे. तसा निर्णय शासनाने घेतला आहे. हे प्रमाणपत्र 31 डिसेंबर पर्यंत पाठवावे लागणार आहे. दरवर्षी ,पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जीवित असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. अन्यथा पेन्शन बंद केली जाते. हे प्रमाणपत्र पेन्शन काढणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागत असून ज्या बँकेत कर्मचाऱ्यांचे पेन्शन खाते आहे त्या बँकेच्या माध्यमातून कोषागार कार्यालयात पेन्शनधारक जीवित असल्याचे प्रमाणपत्र सादर केले जाते. यावर्षी करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता शासनाने प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी वाढविला असून हे प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2020 पर्यंत पाठवावे लागणार आहे.

वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना प्रवास टाळता यावा म्हणून हे प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठविता येणार आहे. पेन्शनधारक जिवंत असल्याचे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून हे पोस्टाद्वारे पाठवल्यास स्वीकारले जाणार आहे. या निर्णयामुळे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत