रायगड माझा वृत्त
बुलडाणा: जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एका पेरूच्या झाडाला लटकून प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी जमिनीला पाय टेकतील अशा झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीये. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या याचा संशय बळावलाय.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात हातनी आणि मालगनी गावादरम्यान एका पेरूच्या शेतात प्रेमी युगुलाचे जोडपे पेरूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या प्रेमी युगलाचे पाय सहज जमिनीला टेकले आहे.
जोडप्याधील मृतक तरूण हा खुपगाव चा ज्ञानेश्वर डुकरे आहे. तर तरुणी ही सविता ढाकणे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ज्ञानेश्वर हा काळूबा पाटील यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता तर मालकाच्या मुलीसोबत त्याचे सूत जुळले होते. काही दिवस अगोदर हे दोघे सुरत येथे पळून गेले होते तर नागपंचमीच्या दिवशी ते गावी परतले होते. या दोघांनी आत्महत्या केली का केली याचा तपास पोलीस करत आहेत.