पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीस दंडासह सक्तमजूरीची शिक्षा

माणगाव जलदगती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

महाड एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी क्लासवरून परत घरी येत असतांना तिला अडवून रस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माणगांव सत्र न्यायालयाने रोजी आरोपीस दंडासह सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली आहे.

 

महाड एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनच्या हद्दीत मौजे काळीज काळेश्रीगनर, ता. महाड, जि. रायगड येथे  दि.१९/१०/२०१६ रोजी यातील आरोपी निलेश आत्माराम जगताप याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही क्लासवरून परत घरी काळेश्रीनगर येथे येत असतांना तिला अडवून तिच्यावर रस्त्यातच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेची फिर्याद महाड एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे येथे केल्यानंतर महाड पोलिसांनी भा.द.वि. कलम ३५४ (ब), ३४१ व पोक्सो कलम ८, १० अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास एम.एन. म्हस्के, पोलिस उपनिरीक्षक, महाड एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे यांनी केला व वरील आरोपीविरूध्द् न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. जलदगती सत्र न्यायालय, माणगांव-रायगड यांचेसमोर झाली. सदर खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील श्री. जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. कोर्टासमोर त्यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. मा. टी.एम. जहागिरदार, सत्र न्यायाधिश, माणगांव-रायगड यांनी आरोपी निलेश आत्माराम जगताप यास दि. ०७/०५/२०१८ रोजी भा.द.वी कलम ३५४ (ब), ३४१ व पोक्सो कलम ८, १० या कलमांतर्गत दोषी ठरवित  ३५४ (अ), ३५४ (ब) प्रमाणे ३ वर्ष व पोक्सो कलम ८ नुसार ३ वर्ष सक्तमजूरी व रू. ५००/- दंड व पोक्सो कलम १० नुसार ५ वर्ष शिक्षा व रू. ५०००/- दंड व दंड न भरल्या २ महिने सक्तमजूरी शिक्षा सुनावली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत