पोलादपूर नजीक लोहारे येथे इको कारच्या धडकेने वृद्ध मोटारसायकल स्वाराचा मृत्यू

महाड : सिद्धांत कारेकर

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर शनिवारी दूपारीच्या सुमारास ७० वर्षाच्या वृद्ध मोटारसायकल स्वाराचा संगमेश्वरकडे जाणाऱ्या इको कारची धडक बसल्याने तो जागीच ठार झालाय.

मोटारसायकलस्वार मोबाईलवर बोलत असताना अचानक या कारने धडक दिली. लोहारा येथील राईस मिल व्यावसायिक रामचंद्र तुकाराम नरे यांना मोबाईलवर फोन आल्याने त्यांनी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मुंबईकडून संगमेश्वरकडे जाणाऱ्या इको कारने रामचंद्र नरे यांच्या मोटारसायकलीसह त्यांना धडक दिली आणि ती कार झाडाला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात रामचंद्र नरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इको कारचा चालक दिनकर मधुकर आमकरआणि त्यांची पत्नी तेजस्वी दिनकर आमकर हे दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत