पोलिसांची दबंगगिरी ….

बुलढाणा: आनंद खंडेराव

पोलिसांच्या अरेरावीचे अजून एक उदाहरण बुलढाणा जिल्ह्यात समोर आले आहे. रस्त्यावर उभा असलेला ट्रक काढण्यावरून पोलिसांनी व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत .  सोशल मिडिया यामध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  


व्यापाऱ्याचा रस्त्यावर उभा असलेला ट्रक काढण्यावरून अमडापूर पोलिसांनी उंद्री  येथील  व्यापारी जगदीश राठी यांना लोखंडी रॉड सह लाथाबुक्क्यांनी रस्त्यावरच जबर मारहाण केलीय .. यावेळी जखमी झालेल्या राठी याना त्यांचा मुलगा सोडवण्यासाठी आला असता त्यालाही पोलिसांनी मारहाण केलीय .. तर घटनेतर जखमी अवस्थेत व्यापारी राठी याना गाडीत टाकून पोलीस स्टेशन ला आणले आणि व्यापारी जगदीश राठी सह त्यांचा मुलगा , ट्रक चालक यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल केलेत  .. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांच्या दबंगगिरीमुळे   परिसरात भीतीचे वातवरण पसरलंय

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत