पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन; सर्वधर्मीयांनी जातीय सलोखा राखावा

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

सर्व जाती-धर्माचे सण एकत्र येऊन साजरे केल्याने समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण होतो, असे मत दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक धर्मराज  सोनके यांनी व्यक्त केले. बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी  पोलीस स्टेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे जातीय सलोखा व इफ्तार पार्टीचे डॉ.ए.आर. उन्ड्रे इंग्लिश स्कूलला  आयोजन करण्यात आले होते; त्यावेळी सोनके बोलत होते..

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गाव शांत आहे. इथे सहसा अनुचित प्रकार घडत नाहीत. घडले तर दोन्ही समाजाचे लोक सामंजस्याने ते मिटवतात. या गावा सारखे शहर अन्यत्र मिळणं दुरापास्तच आहे. आम्ही अन्यत्र गेलो तर या शहराचे  उदाहरण नक्कीच देऊ असे सोनके म्हणाले. माध्यमांशी बोलताना, ते पुढे म्हणाले की, आम्ही माणुसकी हा एकच धर्म मानतो व आमच्या दसरा, दिवाळी या सणात मुस्लीम बांधव आनंदाने सहभागी होतात. आम्ही ही त्यांच्या सणात सहभागी होणे गरजेचे आहे. या भावनेने आम्ही दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करीत असतो. याने धार्मिक सलोखा कायम राहीला जावा हाच आमचा उद्देश आहे.

मुस्लीम बांधव रमजान महिन्यात तीस दिवस उपवास धरतात. त्यामुळे त्यांना वेगळी ऊर्जा मिळते. सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन नमाजमध्ये कुराण पठण करतात. त्यानिमित्ताने सर्व मुस्लीम बांधवाना रमजान निमित्ताने शुभेच्छा दिल्या.श्रीवर्धन तहसीलदार जयराज सुर्यवंशी,   कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष महंमद भाई मेमन,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सिद्धेश कोसंबे,  माजी सभापती शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुकुमार भाई तोडलेकर,माजी जिल्हा प.सदस्य शामकांत भोकरे, तंटामुक्त अध्यक्ष शंकर गाणेकर, महावितरण वरिष्ठ अभियंता महेंद्र वाघपैंजण, सरपंच गणेश पाटील,शिस्ते सरपंच रमेशजी घरत,उप सरपंच मंदार तोडणकर,  दिवेआगर ग्रा.सदस्य सुहास मार्कंडे,महादेव खेडेकर,नंदू भाई पाटील,कोढेपंचतन पोलिस पाटील उदेश वाग्जे,दतात्रय पांढरकामे,माजीद शेठ  आकलेकर,तलाठी संघटनेचे अध्यक्ष अभिजित हिवरकर, देवीदास कावळे,चंद्र्मणी मोरे,गणेश मोहिते मेहिबूब उल्दे,व इतर हिंदू मुस्लिम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप निरीक्षक पराग लोंढे यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलिस निलेश सोनवणे,संदीप चव्हाण यांनी खुप मेहनत घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत