पोलिसांनी वाचवले गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

रायगड माझा वृत्त 

पुण्यात एका तरुणाला पोलिसांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आहे. हा तरुण गळफास घेऊन आत्महत्येच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी अगदी वेळेवर पोहचून त्याचे प्राण वाचवले आहेत.

पुण्यातील कर्वेनगर भागात आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा तरुण गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली घराचा दरवाजा तोडला आणि त्याला वाचवले. रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक महिला वारजे पोलीस ठाण्यात धावत आली आणि माझा मुलगा आत्महत्या करतो आहे, त्याला वाचवा असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला असता या तरुणाने ओढणीने गळफास घेतला होता..पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कात्रीने ओढणी कापून त्याला खाली उतरवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या मुलाच्या आईने पोलिसांचे आभार मानले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत