पोलिस ठाण्याबाबत पारदर्शकता निर्माण होवुन लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण झाले पाहीजे : पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर

रोहे : महादेव सरसंबे 

महाराष्ट्र पोलिस बदलतोय, ऑनलाईन सेवा नागरीकांना मिळत असुन या मधुनच नागरिक आपल्या तक्रारी मांडत आहेत. कामामध्ये पारदर्शकता येत असून पोलिस ठाण्यांच्या चांगल्या इमारती निर्माण झाल्या तर पोलिस कर्मचाऱ्यांना काम करताना चांगली उर्जा निर्माण होऊ शकते असा विश्वास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केलाय. 

रोहा पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना आपला चांगला फिटनेस ठेवेता यावा यासाठी शहीद अशोक कामटे यांच्या नावाने अद्यावत व्यायामशाळा सुरु करण्यात आली असून या व्यायाम शाळेचे उदघाटन प्रसंगी पोलिस अधिक्षक पारस्कर बोलत होते.
या वेळीअप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, रोहा तहसिलदार सुरेश काशिद, रोहा पोलिस निरीक्षक अजमुददीन मुल्ला, नागोठणे पोलिस निरीक्षक  बाळासाहेब घुटुकडे, कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, रेवंदडा पोलिस ठाण्याचे नामदेव बंडगर, रोहा सहाय्यक पोलिस निरीक्षक तायडे, उपनिरीक्षक निकाळजे, होमगार्डचे प्रमुख संजय शिर्के, क्लेअरींटचे गिरीष पेंडसे, चेतन ताठरे, सुदर्शनचे रवि दिघे, एक्सलचे मंचेकर, गोपीनिय पोलिस हरेश्वर सुर्वे, किशोर तावडे, एलपीचे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संजयकुमार पाटील यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांचे प्रशासन व पोलिस यंत्रणा या मध्ये चांगले समन्वय असून नेहीमच त्यांचे सहकार्य असते. पोलिस ठाणे हे नेहमीच कामात आनंद निर्माण करणारे महत्वाचे घटक आहे. त्यामुळे चांगल्या इमारती असल्यास कर्मचारी उत्साही वातावरणात काम करीत असतात.
अमोल गायकवाड यांनी रोहा पोलिस ठाणे हे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या संकल्पनेतून आदर्श पोलिस ठाणे रोहा करण्याचे काम चालु आहे. त्याच बरोबर तक्रारदारांना जास्तीत जास्त चांगली सेवा या पोलिस ठाण्याच्या मध्यमातून मिळत असुन गेली दोन महीने पोलिस निरीक्षक मुल्ला व त्यांचे सहकारी यांचे चांगले काम चालु आहे.
क्लेअरीअंटचे गिरीष पेंडसे यांनी सुनील तटकरे व प्रांताधिकारी गटणे यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शासकीय इमारती असावे अशी संकल्पना मांडल्यानंतर धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांनी मदतीचा हात पुढे केले आहे. सार्वजनिक जीवनात कारखानदारांचा चांगले काम रोह्मात आहे. तर आापल्या प्रास्ताविक भाषणात अजमुददीन मुल्ला यांनी काम करीत असताना कर्मचारी वर्गात मानसिक ताकत असताना शारीरीक शक्ती निर्माण करण्यासाठी आमचे प्रेरणा असलेले शहीद अशोक कामटे व्यायाम शाळा रोहा पोलिस ठाण्यात सुरू केली असल्याचे सांगितले
.
यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तायडे यांनी केले असुन अभार निकाळजे  यांनी मानले. या कार्यक्रमास धाटाव औद्योगिक क्षैत्रातील अधिकारी वर्ग, पत्रकार, रोहेकर नागरीक व पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते|हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा पोलिस निरीक्षक अजमुददीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत