पोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले

रत्नागिरी : रायगड  माझा वृत्त 

आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत एका वयोवृध्द महिलेला तिच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या आणि दोन पाटल्या काढायला सांगून सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा हा ऐवज घेऊन भामटे पळून गेले. ही घटना नाचणे रोड येथे घडली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली विद्याधर भुते वय ७१ रा.सुपलवाडी नाचणे जिन्नस घेऊन घरी निघाल्या होत्या. नाचणे येथील रेशन दुकानासमोर येताच दोन इसमानी त्यांना अडवत आम्ही पोलीस आहोत, रस्त्यावर चेन चोरीचे प्रकार घडत आहेत. तुम्ही जर हे दागिने अंगावर घालून फिरलात तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड होईल म्हणून दागिने काढून पिशवीत ठेवा, असे त्या भामट्यांनी सांगितले. वयोवृध्द महिलेने हातातील चार बांगड्या आणि दोन पाटल्या काढून एका चोरट्याकडे दिल्या. त्यानंतर दुसऱ्या चोरट्याने त्या बांगड्या कागदात बांधून त्या वैशाली भुते यांच्या पर्समध्ये ठेवून ते दोघे साळवी स्टॉपच्या रस्त्याने निघून गेले. वैशाली भुते यांनी घरी आल्यावर पर्स उघडली तेव्हा त्या कागदामध्ये प्लास्टिकच्या बांगड्या सापडल्या. ते दोन चोरटे ३० ते ४० वर्ष वयोगटातील असून खाकी पॅंट आणि पांढरा शर्ट घालून फिरत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत