पोलीस निरीक्षकाला बदलीची ‘शिक्षा’?

 

पुणे : रायगड माझा वृत्त 

भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या पोलिस निरीक्षकाची अचानक बदली करण्यात आली आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर गुन्हा दाखल केल्याने गृह मंत्रालयातून सूत्रे हलवून गायकवाड यांची बदली करवण्यात आल्याची चर्चा आहे.

गायकवाड यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. टिळेकर यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा परिसरातील केबल व्यावसायिकाने तक्रार दिली होती. त्यावरून टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याबाबत गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत