पोलीस महासंचालक पदी सुबोध जयस्वाल तर संजय बर्वे मुंबईचे पोलीस आयुक्त

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे. संजय बर्वे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख पद त्यांनी भूषवले होते. तर, सुबोध कुमार जैस्वाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे ही पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत