पोशीर ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाची सांगता

नेरळ – कांता  हाबळे
      कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्रवार दि १६ फेब्रुवारी रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. शनिवारी दुपारी कर्जत पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने भेट देवून उपोषण कर्त्यांच्या मागण्यासाठी चौकशी समिती स्थापन आली असून तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार का ? आणि कधी होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
    पोशीर ग्रामपंचायातीमध्ये नियमबाहय व मनमानी कारभार सुरू असून तो वारंवार पंचायत समितीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीच्या कारभारात काहीच सुधारणा होत नाही. तसेच कर्जत पंचायत समितीनेही याकडे दुर्लंक्ष केले होते. विदयमान सरपंच ग्रामसभेला विचारात न घेता आपले निर्णय हे मनमानीपणे ग्रामस्थांवर लादत असल्याने ग्रामस्थांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले होते. यावेळी तालुक्यातील अनेक सामजिक संस्था व सामजिक कार्यकर्त्यांनी उपोषण ठिकाणी भेट देवून जाहीर पाठिंबा दर्शविला होता.
        यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती अमर मिसाळ, भाई गायकर, सुनिल गोगटे, कर्जत तालुका कुस्ती फेडरेशन अध्यक्ष-भगवान धुळे, दादा गोमारे, भगवान कराळे, अरुण कराळे, शिवराम बदे, विभाग प्रमुख भरत डोंगरे, दिनेश भोईर, बजरंग श्रीखंडे, संजय तुंगे, आदींनी भेटी देऊन उपोषणाला पाठींबा दिला होता.
        उपोषणाच्या पहिल्या दिवशी पंचायत समितीकडून या संदर्भात कुठलेही लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषण कर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व त्यांनी आमरण उपोषण सुरु ठेवले. त्यानंतर उपोषण कर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंचायत समितीचे शिष्टमंडळ दुसर्यांदा आले. परंतु जोपर्यंत जिल्हा परिषद रायगड यांच्या कडून दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे उपोषण कार्यांनी जाहीर करून आपली भुमीका ठाम ठेवली होती. दुसर्‍या दिवशी दुपारी उपस्थितांच्या विनंतीला मान देवून आणि कर्जत पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने भेट देवून उपोषण कर्त्यांच्या मागण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. व चौकशी समितीच्या अहवालानुसार आपणास कळविण्यात येईल तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत