पोशीर हनुमान मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

 
नेरळ – कांता हाबळे
कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील हनुमान मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी अखंड नामयज्ञ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही शुक्रवार १९ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पोशीर गावात भक्तिमय वातावरण आहे.
       या अखंड हरीनाम सप्ताहामध्ये दररोज काकडा आरती, सामुदायिक भजन, संगीत भजन, प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, हरिकीर्तन, जागर भजन असे अनेक कार्यक्रम पोशीर येथील हनुमान मंदिरात होत आहेत.  ह. भ. प. हर्षद विष्णू काम्बरी, मायरी राणे, प्राजक्ता विरले व शिवराम तुपे यांची प्रवचने होणार आहेत. तसेच योगीराज महाराज गोसावी (पैठण), निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर -समाजप्रबोधनकार), संजय महाराज पाचपोल (अकोला-विदर्भ रत्न व कीर्तन केसरी) यांचे कीर्तन तर जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी)यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
          रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार असून पोशीर गावात पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. या सर्व अखंड हरीनाम सह्प्ताचे मार्गदर्शक म्हणून ह. भ. प. विजय महाराज पाटील (पिंपलोळी) हे काम पाहत असून पोशीर ग्रामस्थ प्रचंड मेहनत घेत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत