प्रख्यात संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचे निधन

मुंबई :रायगड  माझा वृत्त 

शास्‍त्रीय संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्‍या ९१ व्‍या वर्षी निधन झालं. सूत्रांच्‍या माहितीनुसार, आज सकाळी ३ वाजून ५१ मिनिटांनी त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्‍या काही काळापासून त्‍यांना श्वासोच्छवास घेण्‍यास त्रास होत होता.

अन्नपूर्णा देवी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलं होतं. त्‍याचा जन्म मध्य प्रदेशातील मैहरमध्‍ये १९२७ मध्‍ये झाला होता. सुरुवातीला त्‍यांनी संगीताचे शिक्षण त्‍यांचे वडिल उस्ताद ‘बाबा’ अल्लाउद्दीन खान यांच्‍याकडून घेतले होते. सेनिया-मैहर घराणा स्थापित करण्‍यासाठी अल्लाउद्दीन खान यांचं मोठं योगदान होतं. अन्नपूर्णा देवी यांच्‍या प्रमुख शिष्‍यांमध्‍ये आशीष खान (सरोद), अमित भट्टाचार्य (सरोद), बहादुर खान (सरोद), बसंत काबरा (सरोद) आणि हरिप्रसाद चौरसिया (बासुरी) या दिग्‍गज व्‍यक्‍तींचा समावेश आहे.

अन्नपूर्णा देवी यांनी प्रसिध्‍द संगीतकार पंडित रवि शंकर यांच्‍याशी विवाह केला होता. त्‍यांच्‍या मुलाचे नाव शुभेंद्र शंकर असे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत