प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अलर्ट

रायगड माझा

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात तीन संशयित लपले असून ते या प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली आहे.
गुप्तचर खात्याने एका सांकेतिक कॉलच्या आधारे हा अलर्ट जारी केला आहे. कॉलमध्ये तीन संशयित जामा मशीद परिसरात लपले असून ते 26 जानेवारीला मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याचे आढळून आले. जामा मशीद परिसरात लपलेले तिघेही अफगाणिस्तानचे असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये या तिघांचेही ट्रेनिंग झाले असून काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना सूचना दिल्या जात आहेत.
गुप्तचर यंत्रणा सतत या तिघांवर लक्ष ठेवून असून हे तिघेही पस्तो भाषेत संभाषण करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर विशेष बैठक घेण्यात आली.