प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर मंगळवारी ईडी कडून छापे मारण्यात आले. दरम्यान सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक केली आहे.

‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. आता अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत