प्रतीक जुईकर बनले रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी…

कर्जत : अजय गायकवाड

देशात 177 व्या क्रमांकावर

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी

कर्जतकर प्रतिक जुईकर यांनी रायगडकरांची मान उंचावली आहे.24 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) निकालात मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. ते देशात 177 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. याचबरोबर ते रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस होण्याचा मानही प्रतिक जुईकर यांनी मिळवला आहे. या यशानंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.दरम्यान,थेट आयएएस बनलेले प्रतीक जुईकर रायगड जिल्ह्यातील पहिले अधिकारी बनले असून मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून अद्वितीय कामगिरी प्रतीक जुईकर यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी बनलेले प्रतिक चंद्रशेखर जुईकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारे आहेत. कर्जत तालुक्यातील कोल्हारे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचे ते सुपूत्र आहेत. पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचे असलेले प्रतिक जुईकर यांना वाचनाची आवड होती.कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेर दहावी परीक्षेत कर्जत तालुक्यातून पहिले आले होते.पुढे त्यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि ते बी.टेक झाले.त्यानंतर नोकरी करत असताना, तेथील मित्र हे आयआयटी करुन युपीएससीची तयारी करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, प्रतिक जुईकर यांनीही युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. प्रतिक यांच्या आई-वडिलांचीही ते आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती.

अथक परिश्रम करीत, प्रतिक जुईकर यांनी त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून, ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मुलाखतीचा अडथळाही पार केला असून, देशात 177 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस होण्याचा मानही प्रतिक जुईकर यांनी मिळवत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या जिल्ह्यातील अन्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.प्रतिक जुईकर यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशानंतर,कर्जत,अलिबागकरांसह जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत