प्रत्येक गावात एक लाख रोपांचे वाटप करण्याचा संकल्प ड्रीप फाउंडेशनचा संकल्प

म्हसवड: रायगड माझा

माण-खटाव तालुक्‍यात कायम दुष्काळी भाग म्हणून पाहिले जात. मात्र याच जनतेने जलयुक्त शिवारअंतर्गत कामे केल्याने दोन्ही तालुक्‍यात पाण्याची पातळी वाढवण्यात यश आले आहे. बारा महिण्यात आठ महिने टॅंकरने पाणी पिणारे कारखेल व परिसर आज स्वयंपूर्ण झाला आहे. ड्रीम फाऊंडेशन व माणदेश फाऊंडेशनचे प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतुन प्रत्येक गावात एक लाख झाडाचे वाटप करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन अध्यक्षा हर्षदा जाधव-देशमुख यांनी केले.


कारखेल तालुका माण येथील ग्रामपंचायती मध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हर्षदा जाधव-देशमुख बोलत होत्या. अजित पवार, सरपंच शोभा राऊत, उपसरपंच रमेश गायकवाड, सदाशिवराव गायकवाड आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
हर्षदा जाधव देशमुख म्हणाल्या, माण खटावमध्ये झाडांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. हे ओळखूनच गतवर्षीपासून माणदेश फाऊंडेशने उपक्रम हाती घेतला आहे. आता प्रत्येक नागरिकाला एक झाड देवून त्याचे जतन केले तरच आपल्या भागात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. सदाशिवराव गायकवाड यांनी आभार मानले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत