प्रवाशाला चाकाखाली चिरडून विमानाने केले टेक ऑफ

मॉस्को : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for mosco plan take off

रशियातील मॉस्को येथे विमानतळाच्या धावपट्टीवर एका प्रवाशाला (25) चाकाखाली चिरडून विमानाने टेक ऑफ केल्याची भयंकर घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास शेरेमेत्येवो विमानतळावर घडली. विमानतळ प्रशासनानेही यास दुजोरा दिला आहे.

या प्रवाशाला अर्मेनियाला जायचे होते. यामुळे तो कनेक्टींग फ्लाईटची वाट बघत होतो. कनेक्टींग फ्लाईटपर्यंत पोहोचण्यासाठी बस सेवाही उपलब्ध होती. पण इतर प्रवाशांना बसमध्ये चढण्यास वेळ लागत असल्याने संबंधित प्रवासी चालतच विमानाकडे निघाला होता. तो रन वे वरून चालत असतानाच मागून वेगाने धावत येणाऱ्या बोईंग ७३७ या विमानाने चाकाखाली त्याला चिरडत उड्डाण केले. क्षणभर काय झाले ते कोणालाच कळले नाही. पण विमानतळावरील एकाला रन वे वर काहीतरी विखुरल्याचे दिसले. त्याने याबद्दल विमानतळ प्रशासनाला कळवले. त्यानंतर रन वेवर प्रवाशाच्या शरीराचे तुकडे विखुरलेले अधिकाऱ्यांना आढळले. तसेच त्याचे बूट व लेसही रन वेवर सापडली. नंतर तीन रन वे बंद करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत