प्रवीण माने यांच्या प्रयत्नातून इंदापुर येथे ई-लर्निंग संचाचे वाटप

इंदापुर : विजय शिंदे

सर्वत्र दाटलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टींना खीळ बसली असताना, माणूस आधुनिक जीवन पद्धतीचा अवलंब करत आपले मार्गक्रमण करत असताना आता शिक्षण क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत चाललेले प्रत्येकजण सातत्याने पहायला मिळत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व आपल्या इंदापूर तालुक्यातील मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या प्रयत्नातून, नरुटवाडी याठिकाणी ई लर्निंग सेट 43 इंच led tv संचाचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना ही शैक्षणिक गुणवत्ता मिळावी या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या प्रयत्नातून खालील गावातील जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंग संचाचे वाटप करण्यात आले. पळसदेव, वरकुटे बु, माने लावंडवस्ती रुई, कालठण नं 2, न्हावी बोराटवाडी, अगोती 2 ढुकेवस्ती, रुई गावठाण या गावासाठी अश्या पद्धतीच्या सेटचे वाटप करण्यात आले आहे.

नरुटवाडी या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यध्यापक सुरवसे सर, राहुल देवकर, विशाल दिवसे, अक्षय कोकाटे, सुभाष दिवस, प्रविण देवकर, कृष्णा दिवसे, हरी व्यवहारे, गिरीश मारकड, अक्षय शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत