प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात रक्तदान शिबीर

इंदापूर : विजय शिंदे 

पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे रक्तदान शिबीर आयोजित कण्यात आले होते. यावेळी इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेवून रक्तदान केले. इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रवीण माने यांनी कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी रक्तदान शिबिरासह सोनाई चारा छावणीसाठी चारा आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. दरम्यान रक्तदान शिबिरात १५०० हून अधिक बाटल्या रक्त संकलित झाल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी सोनाई परिवार आणि प्रवीण भैय्या माने मिञ परिवार यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला त्याने आयुष्याची काळजी म्हणून हेल्मेट भेट देण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत