प्रशासनाची हाक ग्रामस्थांची साथ…

  • लोकसहभागातून रोहा तालुक्यातील सोनगाव येथे गाळमुक्त तलाव अभियान

  • पाणी टंचार्इ दुर करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचे श्रमदान

  • युवकांसह महीलांचे  श्रमदानासाठी विशेष सहभाग

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यात मोजक्याच गावात मे महीन्यात पाणी टंचार्इ भासत असते.या गावात पाणी टंचार्इ भासु नये त्यांना जलस्त्रोत उपलब्ध व्हावे या उध्देशाने रायगड जिल्हा अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांनी विविध शासकीय अधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्रमदानाची मोहीम हाती घेतली आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाराचे काम रोहा तालुक्यात जोरदार चालु असुन याच अनुषंगाने रविंद्र बोंबले तहसिलदार सुरेश काशिद, पंचायत समिती गटविकास अधिकारी  प्रदिप पवार, ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता प्रशांत म्हात्रे यांच्या नियोजनातून वन तलावातील गाळ काढण्याचे काम मंगळवारी सकाळी सोनगाव ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्यात आले.या वेळी ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग श्रमदानासाठी दिसून आले.

जलयुक्त शिवार, गाळुमक्त धरण व गाळ युक्त शिवार, मागेल त्याला शेत तळे या योजनांचे  काम रोहा तालुक्यात मोठया प्रमाणात नियोजन बध्द चालु आहे.याचे नियोजन व पाहणी स्वता प्रांताधिकारी रविंद्र बोंबले व तहसिलदार सुरेश काशिद व गट विकास अधिकारी प्रदिप पवार करीत आहेत.तालुक्यात  पाणी टंचार्इ मुक्त करण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा नियोजनबध्द काम करीत आहे.याच अनुषंगाने धामणसर्इ येथे श्रमदानातून काम करण्यात आले. त्यांतर सोनगाव हे गाव निवडण्यात आले.रोहा तालुक्यातील हकेच्या अंतरावर असलेल्या  कुंडलिकानदीच्या तीरावरील सोनगाव या गावात मे महीन्यात पाणी टंचार्इची समस्या निर्माण होते. या पाणी टंचार्इवर मात करण्यासाठी गावात पाणी कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे या उध्देशाने प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांनी शासकीय विविध विभागाच्या सहाय्याने सोनगाव येथे वनखात्याचे वरीष्ठ अधिकारी गोडबोले यांच्या सहकार्यातून वनतलावाचे गाळ काढण्याचे ठरविले. गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार या योजनेच्या अनुषंगाने रोहा  तालुक्यात प्रशासनाची हाक ग्रामस्थांची साथ लोकसहभागातून सोनगाव येथे गाळमुक्त तलाव अभियान रबविण्याचे ठरविले. त्यासाठी व गावातील पाणी टंचार्इ दुर करण्यासाठी प्रशासकीय अधिका-यासह ग्रामस्थ व युवक मंडळाचे श्रमदान आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी ही संपुर्ण तयारी करून हातात पिकाव, फावडा, घमेला, कोयती घेऊन सकाळी 6 वाजता श्रमदानाला सुरूवात केली.

250 च्या आसपास ग्रामस्थ विशेषाता युवक व महीला वर्गाने जिददी ने या श्रमदानात सहभाग नोंदवला.  स्वता जातीने रविंद्र बोंबले तहसिलदार सुरेश काशिद, पंचायत समिती गटविकास अधिकारी  प्रदिप पवार, ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता प्रशांत म्हात्रे, शाखा अभियंता चव्हाण, वन विभागाचे वनरक्षक चव्हाण,ठाकूर, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, कृषी अधिकारी महादेव करे, पंस. कृृषी अधिकारी महामुनी, मिलिंद देवकर,ग्रामसेवक प्राजक्ता वारंगे यांच्या सह चिंतामणी खांडेकर यांच्यासह  सोनगाव ग्रामस्थ यांनी श्रमदानात सहभाग नोंदवला

तलावातील नैसर्गिक तयार झालेली वनस्पती व तलावातील गाळ यावेळी ग्रामस्थांनी परीश्राम घेत काढण्यात आले.महीलांचे व तरूण व तरूणींचे योगदान मिळाल्याने या तलावातून बाहेर पाणी जाण्यासाठी पडलेले खडे भरण्यात आले.ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग या वेळी महत्वाचा ठरला आहे.बुधवारी ही या ठिकाणी श्रमदान होणार असल्याचे सांगितले.

सोनगाव या गावाला भविष्यात पाणी टंचार्इ भाषणार नाही यासाठी आपण सर्व मा.जिल्हाअधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शननुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवित असताना हे गाव पाणी टंचार्इ मुक्त करण्यासाठी प्रशासनानी पुढाकर घेतला आहे.श्रमदानातून तलाव गाळमुक्त करीत असताना सोनगाव ग्रामस्थांचे विशेषता महीला वर्गाचे विशेष श्रमदानातून सहकार्य लाभले आहे.संपुर्ण तालुका पाणी टंचार्इ मुक्त करण्याचे आमचे नियोजन असुन 2019 मध्ये टँकर मुक्त रोहा दिसेल.

रविंद्र बोंबले, प्रांताधिकारी 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत