प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग : सुहास तारे

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती कोकण विभागाच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दिव्यांग हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे त्यांनी लक्ष वेधले.

विविध लघु उद्योगासाठी 200 चौरस मिटर जागा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून द्यावी तसेच बेघर अपंगांना स्नेही अशी घरकुल योजना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी राबवण्याची मागणी या संघटनेने केली आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये अपंग काम करू शकतील असे व्यवसाय संधी मिळण्यासाठी संबंधित कंपनी मालकांना निर्देश देण्यात यावे आणि व्यवसायासाठी अपंग बचत गटांना सुलभतेने अर्थ सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील बँकांना एक खिडकी योजना राबवावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सुरेश मोकल यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत