प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून

बीड : रायगड माझा वृत्त 

अनैतिक संबधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खुन करणाऱ्या कावेरी बालासाहेब शिंदे हिला ग्रामीण पोलिसांनी आज (ता.21) शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात अटक केली आहे.

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गळा दाबुन खुन केल्यानंतर त्याचा मृतदेह विद्युत कुंपनावर फेकुन देत शाॅक लागून मृत्यु झाल्याचा बनाव करण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी तपास चक्रे फिरवत कावेरी शिंदे हिचा चेहरा जगासमोर आणला होता.

यानंतर कावेरी शिंदे फरार होती. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी सापळा रचुन शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात कावेरी शिंदे हिला आज अटक करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत