प्रियकराने केला प्रेयसीवर चाकूने हल्ला

चिमूर (जि. चंद्रपूर) : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for MURDER BY KNIFE

तालुक्‍यातील नांदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करून तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर प्रियकरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

चेतन सुरेश गजभे (वय 22) असे प्रियकराचे नाव असून प्रेयसी नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दोघेही नांदारा येथील रहिवासी आहेत. चार वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. चेतनने तिच्या कुटुंबीयांकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईवडिलांनी लग्नाला विरोध दर्शविला. त्यामुळे तो संतप्त झाला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज, सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास प्रेयसी चिमूर येथील महाविद्यालयातून परत येत असताना गावाच्या वेशीवर चेतनने तिला अडविले. लग्नाबाबत विचारले असता तिने नकार दिला. तेव्हाच खिशातून चाकू काढून तिच्यावर सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली. यावेळी तिची मैत्रीण सोबत होती. अचानक झालेल्या हल्ल्याने ती हादरून गेली होती. ती गावात सुसाट गेली. चौकात उभ्या असलेल्या गावकऱ्यांना तिने घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी धाव घेतली तोपर्यंत चेतन घटनास्थळावरून पसार झाला होता. रक्तबंबाळ प्रेयसीला लोकांनी उचलेले आणि चिमूर येथील रुग्णालयात हलविले. तोपर्यंत पोलिससुद्धा पोहोचले होते. इकडे चेतनेही विष प्राशन केले आणि तोही बेशुद्ध झाला. त्यालाही चिमूर येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत