प्रियांका चोप्रा करणार लग्न ,अली अब्बासने केल ट्विट

रायगड माझा वृत्त :

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा लवकरच तिच्या ‘विदेशी बॉय’ निक जोनससोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्रियांकाने तिच्या लग्नाची तयारी सुरू केली असून त्यासाठी वेळ मिळावा म्हणून तिने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान सोबतचा तिचा आगामी चित्रपट ‘भारत’ मधून काढता पाय घेतला आहे. प्रियांकाने ‘भारत’ चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास झफर याला याबाबत कळवले असून अलीने याबाबत ट्विट केले आहे. अलीच्या ट्विटमधून प्रियांकाने निकसोबत लग्न करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

PHOTO: REFINERY 29

‘प्रियांका चोप्रा ही आता ‘भारत’ या चित्रपटात दिसणार नाही. हा निर्णय तिनं आम्हाला योग्य वेळी (निक) कळवला आहे. आम्ही तिच्या या निर्णयावर खूप खूप खूश आहोत. त्याचे कारणही तसे खास आहे. ‘भारत’च्या संपूर्ण टीमकडून तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा’ असे ट्विट अली अब्बास झफरने केले आहे. या ट्विटमधील Nick हा शब्द दोन अर्थांनी वापरण्यात आला असावा. निक चा अर्थ योग्य वेळ असा होतो पण निक नावाचा प्रियंकाचा बॉयफ्रेंड आहे. त्यामुळेच त्यांच्या लग्नाचे संकेत या ट्विटमधून मिळाल्याची चर्चा आहे.

प्रियंका नुकतीच निकसोबत हिंदुस्थानात देखील येऊन गेली. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या साखरपुढ्यात देखील प्रियंका निकसोबत आली होती.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.