प्रियांका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री

नवी दिल्‍ली : रायगड माझा वृत्त 

अभिनेत्री प्रियांका चोप्राने सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत तिची चर्चाच चर्चा होती. काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्राच्या आगामी बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियांका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानचा चित्रपट ‘भारत’ सोडणं आणि तिच्या निक जोनससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियांका सतत चर्चेत होती. त्यामुळेच तर प्रियांका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनलेली आहे.

सलमानची फिल्म ‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडियावर प्रियांका ‘भारत’ चित्रपट सोडत असल्याची घोषणा करतानाच ‘इन निक ऑफ टाइम’ चा सूचक उल्लेख केला होता. त्यामुळे प्रियंका चर्चेत आली होती ९४ गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी असलेली प्रियंका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणाले, ‘आपल्या वाढदिवसाच्या सुमारास भारतात परतलेली प्रियांका निक जोनससोबत गोव्यात फिरायला गेली होती. त्यानंतर प्रियांकाने शोनालीचा चित्रपट आणि सलमानसोबत ‘भारत’ हा चित्रपट करायचा निर्णय घेतला. यामुळे अर्थातच ती सतत बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये चर्चेत राहिली. आता तर ‘भारत’ सोडल्यावर आणि तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामुळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री झालीय.’

‘चौदा भारतीय भाषांमधील सहाशेहून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो,’ असे अश्वनी कौल म्‍हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत