प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘दे धक्का’चा सिक्वल

रायगड माझा वृत्त 

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्कृष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखले जाते. प्रेक्षक नेहमी महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता महेश लवकरच ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘दे धक्का २’ असे आहे.

चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.नुकताच महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दे धक्का २’ चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि इतर कलाकार लंडनच्या रस्त्यावर बंद पडलेल्या कारमध्ये बसलेले पाहायला मिळतायेत. तसेच हा चित्रपट ३ जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते.आता ‘दे धक्का २’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत. तसेच चित्रपटाची निर्मिती यतिन जाधव आणि स्वाती खोपकर करणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत