प्रेम प्रकरणातून प्रेमी युगालांची आत्महत्या!

तरुणीचा धरणात उडी मारून तर तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

म्हसळा : निकेश कोकचा

 

प्रेम प्रकरणातून नैराश्य हाती आल्याने एका तरुणीने चोवीस वर्षीय तरुणीने धरणात उडी मारून आपला जीव दिल्याची घटना घडली आहे. तर या तरुणीने आपला जीव देण्याआधी प्रियकराने देखील पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.याबाबत सविस्तरपणे वृत्त असे की, प्रियांका प्रकाश जाधव वय २४ वर्षे रा.चीचोंडे(पाभरा) या तरुणीने प्रेम प्रकरणातून निराशा हाती आल्याने शुक्रवार दिनांक १८ मे रोजी पहाटे ७ च्या सुमारास पाभरा धरणामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.याच प्रेम प्रकरणातून तिच्या प्रियकराने काही दिवसांआधी विरार (मुंबई) येथे राहत्या घरी पंख्याला दोरी लाऊन गळफास घेतल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे.प्रियांका जाधव हिच्या आत्महत्येची आकस्मित मृत्यू रजिस्टर मध्ये ८/२०१८ मध्ये भाडावी कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक वैभव पाटील हे करीत आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत