प्रो कबड्डी लीग 2018 : गुजरातवर मात करुन यू मुम्बा अव्वल स्थानावर

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमात यू मुम्बाने पुन्हा एकदा अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात यू मुम्बाने गुजरात फॉर्च्यूनजायंट्सला धूळ चारली. प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात मुंबईने पहिल्यांदाच गुजरातला पराभूत केले. यू मुम्बाने 36-26 अशी बढत घेत गुजरातचा पराभव केला. दिल्लीच्या त्यागराज क्रिडा संकूलात हा सामना खेळवण्यात आला.

या सामन्याच्या पहिल्या सत्रात यू मुम्बा तीन पॉइंट्स ने पुढे होती. यानंतर उर्वरीत 20 मिनिटात देखील यू मुम्बा ने आपल्या पॉइंट्स च्या बढतीचे स्थान कायम राखले आणि सामन्यात विजय मिळवला. यू मुम्बा ने सहाव्या पर्वात खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांपैकी 13 सामन्यात विजय मिळवला तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

13 सामन्यात विजय मिळवल्यानंतर यू मुम्बा 72 पॉइंट्स घेऊन अ गटात अव्वल स्थानावर पोहचली आहे.या सामन्यात यू मुम्बाच्या रेडींगमध्ये सिद्धार्थ देसाई, रोहित राणा, रोहित बाल्यान आणि धर्मराज चिरलाथन यांनी प्रत्येकी सहा-सहा पाॉइंट्स मिळवले. या संपूर्ण सामन्यात दोन्ही बाजूच्या डिफेंडर्सनी त्यांचे वर्चस्व राखले. पहिल्या सत्रापासूनच दोन्ही संघातले डिफेंडर्स प्रतिस्पर्धी संघाच्या रेडींगवर आक्रमक भूमिका बजावत होते. त्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस यू मुम्बाने गुजरातवर 17-14 अशी आघाडी मिळवली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत