‘प्लॅटफॉर्म सिंगर राणू मंडलवर बनणार बायोपिक

मुंबई: रायगड माझा वृत्त 

राणू मंडलच्या आयुष्याचा पट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल’ असं या बायोपिकचं नाव असणार आहे. रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी राणू मंडल रातोरात स्टार झाली.

सोशल मीडियामुळे रातोरात राणू मंडल सेलिब्रिटी झाल्या, त्यामुळे सोशल मीडियाची ताकद काय करू शकते हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं तिचं आयुष्य बदललं. या चित्रपटासाठी सुदीप्ता चक्रवर्ती हिला विचारण्यात आलं असून तिनं होकार कळवल्यावर इतर कलाकारांचा शोध होईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत