प्लॅस्टिक बंदीबाबत ठोस कृती आराखडा नाही

आयोजित कार्यशाळेत फक्त प्लॅस्टिक कायद्याची उजळणी

 

पुणे : रायगड माझा

राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतेही ठोस कार्यवाही केली जात नाही. या बंदीबाबत नुकतीच मंडळातर्फे  विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यशाळेत प्लॅस्टिक कायद्याच्या उजळणीशिवाय इतर कोणताही ठोस कृती आराखडा करण्यात आला नाही.

मंडळाबरोबरच “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट’, “वेस्ट मॅनेजन्मेंट अँण्ड रिसर्च सेंटर’ यांच्यातर्फे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांमधील सर्व शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मंडळाचे सहसंचालक वाय. बी. सोनटक्के यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे, पुणे विभागीय अधिकारी जगन्नाथ साळूंखे, उपविभागीय अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते.

यावेळी सोनटक्के यांनी प्लॅस्टिक बंदीचे नविन नियम, त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना दंड कसा आकारायचा, नेमक्‍या कोणत्या गोष्टी प्लॅस्टिक बंदीतून वगळण्यात आल्या आहेत, याची माहिती दिली. मात्र जमा केलेल्या प्लॅस्टिकबाबत नेमके काय करावे? त्याची विल्हेवाट कशी लावायची याचा कोणताही ठोस कृती आराखडा यावेळी सांगण्यात आलेला नाही. याबाबत सोनटक्के म्हणाले, “सध्या मंडळातर्फे जनजागृतीबाबत जास्त भर दिला जात आहे. प्लॅस्टिक विल्हेवाट अथवा पुनर्वापर करण्याची सक्षम यंत्रणा राज्यात उपलब्ध असून, त्याचा वापरावर आगामी काळात भर दिला जाईल.’

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत