फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री

मुंबई : रायगड माझा वृत्त 

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टायलिस्ट पत्नी अधुना भबानी यांचा घटस्फोट झाल्यानंतर फरहान आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी चांगलीच रंगली होती. मात्र आता या दोघांचंही ब्रेकअप झाला असून फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री झाल्याची चर्चा सुरू आहे.

फरहान अभिनेत्री आणि गायिका शिबानी दांडेकर हिच्या प्रेमात पडल्याचं बोललं जातं आहे. २०१५मध्ये एका रिअॅलिटी शोच्या शूटिंग दरम्यान या दोघांची ओळख झाली. फरहान या शोचं सुत्रसंचालन करत होता. तेव्हा पासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. शिबानी आणि फरहान या दोघांनीही याबद्दल बोलण्यास नकार दिला असून सध्या दोघेही लंडनमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

सुलतान, शानदार आणि रॉय यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या शिबानीच्या हॉट फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असते. तर फरहान त्याच्या अफेअर्समुळं जास्त चर्चेत असतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत