फसव्या घोषणांचे फसवे मोदी सरकार; आमदार सुरेश लाड यांचा हल्लाबोल  

कर्जत : रायगड माझा वृत्त  

महागाईच्या आणि इंधनावरील वाढत्या दर वाढीविरोधात आज राष्ट्रवादी कॉग्रेसने कर्जत तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत आमदार सुरेश लाड यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फसव्या घोषणांचे फसवे सरकार असल्याचा आरोप लाड यांनी यावेळी केला. 

कर्जत बाजारपेठेतील लोकमान्य टिळक चौकातून निघालेल्या या निषेध मोर्चाचे नेतुत्व आमदार सुरेश लाड यांनी केले. या मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान पेट्रोल आणि डीजेलच्या दर वाढीविरोधात निषेध करतांना या मोर्चात बैलगाडीचा समावेश करण्यात आला होता.

कर्जत तहसील कार्यलयावर हा निषेध मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी तानाजी चव्हाण यांनी मोदी आणि फडणवीस सरकारने केलेल्या घोषणा ह्या फसव्या असून येत्या निवडणुकीत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे काम जनताच करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर पूनम शेलार यांनी भाजपच्या सरकारच्या काळात महिलाच्या अत्याचारात मोठ्या  प्रमणावर वाढ झाली आहे. भाजपचे आमदार मुली पळवून नेण्याची भाषा करतात आणि भाजपा सरकार त्या आमदारावर कोणतीच कारवाई करत नसल्याचा राग त्यांनी व्यक्त केला.

आमदार सुरेश लाड यांचा हल्लाबोल 

या मोर्चाचे नेतुत्व करणारे आमदार सुरेश लाड यांनी यावेळी भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढविला. उद्योजकांचे भाजपा सरकार असून सामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांच्या समस्या ह्या सरकारला दिसून येत नाहीत. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणारे सरकार ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेवर मात्र दुर्लक्ष करीत आहेत. शेतीमालाला दीड पट भाव मिळेल असे आश्वासन देणारे सरकार आता मात्र उत्पादनाएव्हडा देखील भाव देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

कॉंग्रेसच्या काळात इंधनावरील दर स्थिर 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात इंधन दरवाढ स्थिर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला, मात्र मोदी सरकारने इंधनावरील दरवाढ कायम सुरु ठेवली आहे. GST सारखे कर लादून छोट्या उद्योजकांना संपवण्याचे काम या मोदी सरकारने केला आहे. नोटा बदण्याचा फसवा निर्णयामुळे सर्वसामन्यांचे खिसे खाली करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. राज्यातील रस्त्यांची अवस्था हि अतिशय वाईट झाली आहे. खड्डा दाखवा आणि पैसे मिळावा अशी घोषणा करणारे मंत्री मात्र त्याच खड्ड्यातून जाऊन पावसाला दोष देण्याचे काम करीत आहेत.

शिवसेनेचा वाघ मांजर झाली आहे 

शिवसेनेचा वाघ हा मांजर आणि शेली कधी झाली ते समजलंच नाही, फक्त डरकाळ्या फोडण्याचे काम शिवसेना करत आहे. सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत लागते, ५६ इंच छातीपुढे तुमच काय चालणार. या महागाईला भाजपा जेव्हडी जबाबदार आहे तेव्हडीच शिवसेना देखील आहे. शिवसेना फक्त सत्तेत राहण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील सुरेश लाड यांनी यावेळी केलाय.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत