फिफा विश्‍वचषक: ब्राझिलसमोर आज बेल्जियमचे आव्हान

 

रायगड मझा वृत्त 

कझान अरेना: बाद फेरीतील पहिल्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा एकतर्फी पराभव करून फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेची उपान्त्यपूर्व फेरी गाठणाऱ्या ब्राझिलसमोर आज तुल्यबळ बेल्जियम संघाचे आव्हान आहे.

ब्राझिल संघाला चार वर्षांपूर्वी जर्मनीकडून 1-7 अशा अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्याचा वचपा काढण्याचा निर्धाराने ब्राझिल संघ या विश्‍वचषकात खेळताना दिसतो आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याचे आव्हान ब्राझिलसमोर होते. त्यात त्यांना पहिल्यांदा अपयश आले. परंतु साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ब्राझिलने सर्बियाचा एकतर्फी पराभव करताना बाद फेरी गाठली. तर उपउपान्त्यपूर्वफेरीत त्यांनी जर्मनीला धक्‍का देणाऱ्या मेक्‍सिकोचा अखेरच्या सत्रातील दोन गोलच्या जोरावर पराभव करून उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

खरे तर त्या सामन्यातील विजयाचे सर्व श्रेय जाते ते ब्राझिलचे प्रशिक्षक टेटे यांना. टिटे यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल करताना संघाची उत्कृष्ट बांधणी केली होती. आक्रमकपणा ही जरी ब्राझिलची ओळख असली, तरी बचावाशिवाय विश्‍वचषक जिंकता येत नाही हे त्यांनी ब्राझिलियन फुटबॉलपटूंना समजावले आणि त्यांच्या डावपेचांची प्रचीती मेक्‍सिकोवरील विजयाने आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत