फुग्यासोबत खेळता-खेळता चिमुरड्याचा मृत्यू

नागपूर :  रायगड माझा ऑनलाईन 

फुग्यासोबत खेळता-खेळता चिमुरड्याचा मृत्यू

फुगा श्वसननलिकेत अडकून एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. सानिध्य आनंद उरकुडे असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. अवघ्या सहा वर्षीय सानिध्यचा खेळता – खेळता मृत्यू झालाय. सानिध्य शुक्रवारी २५ जानेवारी रोजी रात्री आपल्या घरासमोर खेळत होता. सानिध्यच्या हातात तीन फुगे होते. त्यातील एक फुगा फुगवत असताना सानिध्यनं हा फुगा गिळला… त्यामुळे तो फुगा त्याच्या श्वसननलिकेत जाऊन अडकला.

सानिध्यला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानं तो रडू लागला आणि धावत आईकडे पोहचला. आईनं त्याला तातडीनं डॉक्टरांकडे घेऊन गेली. मात्र, एव्हाना त्याचा मृत्यू झाला होता.

अतिशय दुर्दैवी आणि अनपेक्षित अशा या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत