फुटपाथवर आलेले साहित्य आणि दुकानाच्या बाहेर आलेले साहित्य नगरपरीषद हटवणार

रोहे : महादेव सरसंबे

महाराष्ट्रभर प्लास्टीक बंदीची मोहीम तीव्र होत असताना रोह्मात ही प्लास्टीक बंदीची मोहीम देखील तीव्र करण्यात आली आहे. रोहा अष्टमी नगरपरीषदेच्या वतीने प्लास्टीक जप्त करीत असताना कडक कारवार्इचे संकेत दिल्यानंतर या विषयाची माहीती व्यापारी वर्गाना सविस्तर व्हावी यासाठी रोहा अष्टमी नगरपरीषदेच्या दालनात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आणि मुख्याध्याकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या वेळी सभापती समिर सकपाळ, सुजाता चाळके, गटनेते मयुर दिवेकर, नगरसेवक अहमद दर्जी, महेंद्र गुजर, जुबेर चोगले, अमित उकडे, नेहा पिंगळे, निवास पाटील, व्यापारी मंडळाचे विलास गुजर, रामशेठ कापसे, संदिप चोरगे, रामनरेश कुशवाह, भरत जैन, सचिन चाळके, नारायण कान्हेकर, दिपक जैन, बोरणा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी व्यापारी वर्ग आमचा स्नेही आहे. परंतु व्यापारी वर्गानी ही रोहा शहारच्या विकासाच्या दॄष्टीकोनातून सहकार्य करण्याची भुमिका घेतली पाहीजे. त्यामुळे व्यापारीवर्गानी प्लास्टीकचा वापर टाळावा असे आवाहन करून या पुढे रोहा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहारातील फुटपथवर आलेले साहित्य काढण्यात येणार असुन कोणते ही अतिक्रमण ठेवण्यात येणार नसल्याचे सांगितले.

मुख्याध्याकारी बाळासाहेब चव्हाण यांनी प्लास्टिक बंदीचे नियम व सुचना सांगत व्यापारी वर्गाने सहकार्यानेचे आवाहन केले. या पुढे ज्यांच्याकडे प्लास्टीक पिशव्या असतील त्यांनी उत्स्फुर्तपणे नगरपरीषदेच्या ताब्यात द्या अन्यथा कडक कारवार्इ करणार असल्याचे सांगितले. यावेळी समिर सकपाळ आणि मयुर दिवेकर यांनी आपले मनोगत मांडले व काही सुचना दिल्या. या चर्चेत व्यापारी रामशेठ कापसे, संदिप चोरगे, रामनरेश कुशवाह, दिपक जैन यासह आन्य व्यापारी वर्गानी आपल्या सुचना मांडल्या. तर कापड व्यापारी वर्गानी काही काळ आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत