फूलन देवीची हत्या करणा-या शेरसिंह राणाची भूमिका साकारणार अजय देवगण?

 

मुंबई : रायगड माझा 

बॉलीवूडमधील अभिनेता अजय देवगन हा मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर आधारित असलेल्या “तानाजी ः द अनसंग वॉरयिर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा फस्ट लुक गतवर्षी स्वतः अजयने सोशल मिडीयावर शेअर केला होता, जो सर्वांनाच खुप आवडला होता. तसेच आता अजय देवगन मोठया पडद्यावर शेर सिंह राणाची भूमिका साकारत आहे. फूलन देवी हिची 25 जुलै 2001 रोजी तिच्या दिल्ली स्थित असलेल्या घरी हत्या केल्याचा आरोप राणावर आहे.

राणा याच्या जीवन प्रवासाने अजय देवगन प्रभावित झाल्याने तो या चित्रपटाकडे आकर्षित झाला. राणा हा 2004 रोजी तिहाड कारागृहातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने दावा केला होता की, 12व्या शतकातील प्रशासक पृथ्वीराज चौहान यांचे अवशेष आणण्यासाठी अफगानिस्तानला गेलो होतो. त्याला 2006मध्ये कलकत्ता येथून अटक केली होती. त्याने आपल्या जीवनप्रवासावर “जेल डायरी ः तिहाड ते काबुल-कंधार’ हे पुस्तक लिहिले आहे.

दरम्यान, अजय देवगन या चित्रपटाची तयारी पुढील वर्षीपासून करणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्याप निश्‍चित नसून तो स्वतः या बायॉपिक चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत