फेसबुकवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात!

नेरळ : रायगड माझा वृत्त 

फेसबुकवर ओळख झालेल्या एका तरुणाने कर्जतमधील मुलीशी फेसबुकवर मैत्री करून नंतर प्रेमसंबंध आणि लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेचा कर्जत लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याला 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
याबाबत कर्जत लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत शहरात 17 वर्षीय मुलगी कुटुंबीयांसह राहते. या मुलीची 3-4 महिन्यांपूर्वी रिहान नावाच्या 21 वर्षीय तरुणासोबत फेसबुकवर मैत्री झाली. या मुलाने खोटे नाव सांगून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि तो कर्जतमध्ये मुलीला भेटायला येत होता. प्रेमात बुडालेल्या मुलीसोबत रिहान याने कर्जत परिसरातील लॉजमध्ये शारीरिकसंबंध प्रस्थापित केले. प्रेमात रमून गेल्याने त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध झाले.

मुलीच्या वागण्यातला बदल घरच्यांनी ओळखताच त्यांना संशय आला. त्यामुळे सर्वजण तिच्यावर पाळत ठेवू लागले. परिणामी रिहानला भेटणे, बोलणे अवघड झाले. एके दिवशी संधी साधून तिने रिहानला सांगितले आणि 8 एप्रिल रोजी तो कर्जत येथे आला. घरातून बाहेर पडताना मुलीने मोबाईल घरीच ठेवून त्यातले सीमकार्ड सोबत घेतले. कर्जत रेल्वे स्थानकात रिहानसमोर असतानाही त्याच्याशी बोलता येत नव्हते. घरचे अथवा ओळखीचे कोणी पाहतील म्हणून तिने शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेला विनंती करून सीमकार्ड तिच्या मोबाईलमध्ये टाकले. रिहानने फोनवर सांगितल्यानुसार ती सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चढली आणि दोघांनी पुणे गाठले. दरम्यान, सायंकाळी मुलगी बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला. रात्रभर तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची नोंद करण्यात आली.

रिहानसोबतच आपली मुलगी पळाली, असा संशय मुलीच्या घरच्यांनी व्यक्त केला होता. मुलीला वारंवार फोन येणाऱ्या 2 मोबाईल क्रमांक तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांच्या हाती लागले. मात्र दोघेही रिहानला ओळखत नव्हते. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता एकाने चुलत भाऊ अस्लम स्य्यद (21) याची माहिती दिली. तो कर्जत येथील एका मुलीसोबत फोनवर बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अस्लमचा शोध सुरू केला.
अस्लम हा पुणे येथे राहत आहे अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली व पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोबाईल नंबर मिळाला, अस्लम हा तेथे स्लॅब टाकण्याचे काम करत होता पावसाळ्यात जास्त काम नसल्याने तो तेथेच राहत होता.  पोलीस शिपाई संदीप पुजारी यांनी सायबर सेल व आधुनिक तंत्रज्ञान, टॉवर लोकेशन चा वापर करून नमूद आरोपी पिंपरी परिसरात मैत्रेवाडी जवळ राहत असल्याचे माहीत मिळाली नंतर सापळा लावण्यात आला व फेक कॉल करून तुमचे कुरियर  आले आहे असे सांगून त्यांना पकडण्यास आले. पोलिसांसमोर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. 27 जुलै त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
मुलीला अलिबाग येथील बाल संगाेपण गृहात नेण्यात आले. मात्र मुलीने सर्व हकीगत सांगितल्यामुळे बाल संगोपण गृहाने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितली. वैद्यकीय अहवालानुसार कर्जत लोहमार्ग पोलिसांनी (गु. र. क्र. 35/18) भादंवि कलम 363, 376, 34 सह पोस्को अॅक्ट 3, 4 नुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा उपभोग घेणाऱ्या अस्लम सय्यद याला तुरुंगात धाडण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी सरकाळे, पोलीस शिपाई स्वप्नील मसने,पोलीस शिपाई संदीप पुजारी,  पोलीस शिपाई सचिन होळकर, पोलीस शिपाई नाईक, पोलीस शिपाई गोळे.,आदी पोलीस पथकाने उत्तम कामगिरी बजावली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.