फेसबुकवर मैत्री करून कर्जतमध्ये मुलीवर अत्याचार

अश्लिल चित्रफित दाखवून धमकवण्याची दिली धमकी

नेरळ : कांता हाबळे 

फेसबुकवर मैत्री करून कर्जतमध्ये मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नेरळ, माथेरान आणि चिपळूण येथील लॉजवर या तरुणीला नेवून तिच्यावर धमकावून अत्याचार केले असल्याची  माहिती या तरुणीने दिली आहे.  

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 1 मार्च 2017 रोजी 11:00 ते दिनांक  17 जुलै 2018 रोजी 11:00 वा च्या दरम्यान आरोपी सागर नारायण जाधव रा. राधाक्रष्ण अपार्टमेंट भिसेगाव कर्जत यांनी महिला फिर्यादी रा. 108/2 तोरणा विदयापीठ निवासस्थान गुलाबी कॉलनी, हालीवली, कर्जत यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील वर्षी फेसबुकवर मैत्री झालेल्या मुलीचे अठरा वर्षे पूर्ण नसताना व अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर दि २० फेब्रुवारी २०१८ ते १७ जुलै २०१८  रोजी पर्यत फेसबुकवर फिर्यादि हिचेशी मैत्री करून त्यानंतर तीचा विश्वास संपादन करून फिर्यादि यांचे अठरा वर्षे पूर्ण नाही हे माहीत असताना सुदधा फिर्यादि हीचे बरोबर हॉटेल  नेरळ, माथेरान येथील लॉजवर  एक वेळा नेरळ मधील दूस-या लॉजवर  दोन वेळा व चिपळून येथील लॉजवर अशा अनेक ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आले आहेत. तसेच  फिर्यादि याने धमकावून आपले फोटो तुझ्या आईवडीलांना दाखवेन तसेच तुझ्या आईवडीलांना मारून टाकेन आणि बदनामी करेन असे धमकावून अश्लिल चित्रफित दाखवून अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आधी शारीरीक सबंध ठेऊन त्यानंतर फिर्यादि यांचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देखील फिर्यादि यांचे मर्जीविरूदध कॉलेजमध्ये तुझी बदनामी करेन व तू  वेश्या आहेस असे सर्वांना सांगेन असे धमकावून जबरदस्तीने त्याचेबरोबर राहण्यास भाग पाडून लहान मुलांची अश्लिल चित्रफीत दाखवून फिर्यादि यांचेबरोबर नैसर्गिक व अनैसर्गिक संबध ठेवले.
याबाबत नेरळ पोलीस ठाणे कॉ.गु.र.न.108/2018 भा.द.वि.सं.कलम 376,377,506, बाल लै.अत्या.संरक्षण (पॉस्को) अधिनियम 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई मोहिते हे करीत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.