फॉर्म नंबर 17 भरण्याची ऑनलाईन सुविधा सुरू; 2 ते 28 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार अर्ज

भांडुप : किशोर गावडे (प्रतिनिधी)

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .

फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. दिनांक 2 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज व शुल्क भरता येणार आहे. या मुदतीत मूळ अर्ज ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायांकित प्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करायचे आहेत. शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

कोरोनामुळे 2020 मधील परीक्षांचा निकालास झालेला विलंब लक्षात घेऊन खाजगी विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणी बाबत शाळा महाविद्यालय सोडल्याची तारीख 30 सप्टेंबर ग्राह्य धरण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या वयासाठी 30 जून ही तारीख निश्चित केलेली आहे. अशी माहिती, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत