फोन आला तरी घाबरायचे भय्यू महाराज, घरातूनच मिळत होती बदनामी करण्याची धमकी

– आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वी भय्यू महाराजांनी कोणाबरोबर तरी 10 लाखांच्या लोनबाबत चर्चा केली होती

– भय्यू महाराजांनी गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये त्यांच्या अेक संपत्तींची विक्री केली होती

इंदूर : रायगड माझा 

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांना नवी माहिती हाती लागली आहे. गोळी झाडून घेण्याच्या सात दिवसांपूर्वी भय्यू महाराज खूप तणावात होते. त्यांच्यावर केवळ पत्नी आणि मुलगी कुहू यांचाच तणाव नव्हता. तर इतरही अनेक तणाव असल्याचे समोर येते. त्यांनी अनेक ट्रस्टमधूल पदे हळू हळू सोडली होती. व्यवसाय आणि दानही कमी झाले होते. पोलिसांच्या मते त्यांना घरातूनच त्यांची बदनामी करण्याची किंवा चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची धमकी मिळत होती. मुलीला लंडनला पाठवण्याचा विषय आणि पत्नीबरोबरच्या वादाला ते रोज तोंड देत होते. मुलीला लंडनला पाठवण्यासाठी 10 लाखांपेक्षा जास्त पैसे लागणार होते. कुटुंबीय त्याला तयार नव्हते. कुटुंबातील सुत्रांच्या मते, भय्यू महाराजांना त्यांची प्रतिमा मलिन होण्याची सर्वाधिक भिती होती, असे पोलिसांना समजले आहे.

चहूबाजुंनी तणावात होते भय्यू महाराज
1. कुटुंब : मुलीला लंडनला पाठवण्यास विरोध

पोलिसांना माहिती मिळाली आहे की, आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी भय्यू महाराजांनी कोणाबरोबर तरी 10 लाखांच्या कर्जाबाबत चर्चा केली होती. कदाचित मुलीला लंडनला पाठवण्यसाठी त्यांना हे कर्ज हवे होते. त्यावरूनही कुटुंबात वाद होते. पत्नीच्या कुटुंबातील लोक भय्यू महाराजांच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून होते.

2. नीकटवर्तीय : एकांतात बोलायचे फोनवर
– काही फोन येताच ते विचलित व्हायचे. अनेकदा सेवादार विनायक आणि इतरांना बाजुला करून फोनवर बोलायचे. एका बिल्डरचा फोन येताच त्यांच्या वागणुकीत बदल व्हायचा. त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांनीही हे मान्य केले आहे.
– ज्या फोन क्रमांकावर ते सर्वाधिक बोलले त्यात त्यांची मुलगी, पत्नी, विनायक, शेजारी मनमीत अरोरा आणि पुण्याचा सेवादार अनमोल चव्हाणचा समावेश आहे.

3. ट्रस्ट : काही महत्त्वाचे लोक सोडून गेले
– दुसऱ्या लग्नानंतर महाराजांचे वर्चस्व कमी होऊ लागले होते. सूर्योदय ट्रस्टशी संबंधित काही प्रमुख लोकांनी हळू हळू त्यांची साथ सोडली होती. त्यामुळे त्यांचा फारसा कोणावर विश्वास राहिला नव्हता.
– गरिबांसाठी जे कार्य श्री सद्गुरु दत्त धार्मिक – पारमार्थिक ट्रस्टने सुरू केले होते, ते योग्यपणे सुरू राहणार नाही याचीही भिती त्यांना होती. महाराष्ट्रातून येणाऱ्या अनुयायांची संख्याही घटली होती.

4. प्रॉपर्टी : अनेक मालमत्ता विकल्या
– महाराजांनी गेल्या सात-आठ महिन्यांत त्यांच्या मालमत्ता विकल्या होत्या हेही समोर येत आहे. त्यांना सर्व काही विकून मुलीला लंडनला पाठवण्याची इच्छा होती.
– पण त्यांच्या जीवनात त्यांची पत्नी आणि सासरच्या लोकांचा हस्तक्षेप वेगाने वाढत होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत