फ्रिजमध्ये बंद होऊन अमेरिकेत शिरताना 78 जणांना अटक

रायगड माझा वृत्त

 

चक्क रेफ्रिजेरेटरमध्ये बंद होऊन अमेरिकेत प्रवेश करू पाहणाऱ्या 78 जणांना अमेरिकेच्या सीमा गस्ती पोलिसांनी अटक केली आहे. यात काही भारतीय लोकांचाही समावेश आहे.

हे लोक अमेरिकेत अवैध मार्गाने प्रवेश करू पाहत होते, असे यूएस बॉर्डर पॅट्रोलच्या अधिकाऱ्यांनी टेक्सासमधील एका तपासणी नाक्यावर या लोकांना अटक केली होती. हे सर्व जण एका रेफ्रिजेरेटेड ट्रेलरमध्ये 78 बंद होते. या सर्वांची प्रकृती उत्तम होती आणि ते मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, एल साल्वाडोर, ब्राजील, इक्वाडोर, भारत आणि डोमिनिकन गणराज्य या देशांचे नागरिक होते, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अन्य एका कारवाईत, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट (आयसीई) आणि एन्फोर्समेंट अँड रीमूव्हल ऑपरेशन्स (ईआरओ) या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी 100 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई पाच दिवस चालू होती. अटक केलेल्यांमध्ये होंडुरास, एल साल्वाडोर, मेक्सिको, ग्वाटेमाला, अर्जेंटीना, क्यूबा, नाईजेरिया, भारत, चिली आणि तुर्कीच्या नागरिकांचा समावेश असल्याचे आयसीईने म्हटले आहे. मात्र या संस्थांनी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या जाहीर केलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत