फ्रिडम ग्रुपच्या तरुणाचा स्तृत्य उपक्रम एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप महाविदयालयीन विद्यार्थ्यचे प्लॅस्टिक पिशवी विरोधात पथनाट्य द्वारे जनजागृती

 

स्नेहल जगताप,नगराध्यक्षा महाड

तरुण फ्रिडम ग्रुप आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा

हा फ्लॅस्टिक विरोधी जनजागृती मुळे मी प्रभावीत झाले

असून  शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना

माझे आणि महाडकरांचे नेहमीच सहकार्य असेल.

( महाड – मयुरी खोपकर )

शहरातील फ्रिडम ग्रुपच्या तरुणांनी प्लॅस्टिक पिशवी विरोधात एक स्तृत्य उपक्रम राबवित संपूर्ण शहरांत एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विध्यार्थी विद्यार्थीनीनी या उपक्रमात सहभागी होत प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात पथनाटय सादर करीत फ्लॅस्टिक पिशव्या मानवी जीवना बरोबर प्राण्यांच्या जीवाशी आणि प्रदूषणास कशा घातक आहेत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली
मंगळवारी सकाळी ७ वाजता फ्रिडम ग्रुपच्या तरूणांनी . हास्य संस्थेतील जेष्ठ नागरिकांना कापडी पिशव्यांच वाटप करित या उपक्रमाचा शुभारंभ केला हा स्तुत्य उपक्रम पाहुण जेष्ठ नागरिकांनी तरूणाच कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभा आशिर्वाद दिले
यांनतर डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सांस्कृतीक विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत नागरिकांनी फ्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा प्रदूषण हटवा असा संदेश देत महाडकरांची मने जिंकली प्रत्येक ठिकाणी ग्रुपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले या जनजागृतीच्या पहिल्याच मोहिमेत या तरूणांनी एक हजार कापडी पिशव्यांच वाटप केले
यानंतर या तरुणांनी महाड नगरपालिका कार्यालया समोर नगराध्यक्षा स्नेहल जगताप सर्व नगरसेवक कर्मचारी यांच्यासमोर फ्लॅस्टिक पिशव्या विरोधातील पथनाटय सादर करीत त्यांनाही कापडी पिशव्यांचे वाटप करीत त्यांची वाहवा मिळविली.

या मोहिमेत फ्रिडम ग्रुप महाडचे सर्व सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागांतील विद्यार्थी तसेच प्राचार्य धनाजी गुरव प्राध्यापक बोराळे सर शिरसागर सर व समिर गाडगीळ सर यावेळी उपस्थित होते तर फ्रिडम ग्रुपच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वि पार पाडला.
फ्रिडम ग्रुपच्या वतीने तालुक्यात शहरात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या स्तुत्य उपक्रमाचा महाडकरांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान तरुण फ्रिडम ग्रुप आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा हा फ्लॅस्टिक विरोधी जनजागृती मुळे आपण प्रभावीत झालो असून त्यांच्या पुढील लोको उपयोगी प्रयत्नांना आपण पालिकेतफै सहकार्य करू असे आश्वासन नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी दिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत