फ्रेंडशिप डेच्या आधीच केला मैत्रिणीचा खून

मुंबई : रायगड माझा वृत्त 

उद्या सगळीकडे फ्रेंडशिप डे साजरा होतोय. त्यासाठी सगळ्या बाजारपेठा गिफ्ट्सनी सजल्यात. पण ठाण्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडलीये. मैत्रीला नकार दिला म्हणून मित्रानंच आपल्या मैत्रिणीचा खून केला.  एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर एका तरुणाने चाकूनं हल्ला करून तिची हत्या केलीये. आज सकाळी ११ वाजता ही घटना घडली असून ठाण्यातल्या नितीन कंपनी जवळील वाहतूक पोलीस चौकीला लागून असलेल्या एका गल्लीत प्राची झाडे नावाच्या एक तरुणी जात असताना तिला विकास पवार नावाच्या मुलाने थांबवले आणि तिझ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ही बाचाबाची नंतर भांडणापर्यंत पोहोचली आणि आकाश पवार नावाच्या तरुणाने प्राचीला थेट चाकूनं पोटात भोसकलं आणि नंतर तिच्या अंगावर सपासप वार केले आणि तो फरार झाला.  हा विकास पवार ठाण्यातील काल्हेर परिसरात राहणारा असून पोलीस त्याचा शोध घेतायेत.

आकाश पवारचं प्राचीवर एकतर्फी प्रेम होतं. याआधी देखील आकाश पवार याने प्राचीला एकतर्फी प्रेमातून अनेकदा मारण्याची धमकी दिली होती आणि त्यामुळे प्राचीने आकाश पवार विरोधात पोलीसात तक्रार केली होती.  पण पुन्हा प्राचीला त्रास देणार नाही असं आश्वासन विकासने पोलिसांना दिले होते.  त्यानंतर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट एक महिन्याने आज आकाशने प्राचीला नितीन कंपनीजवळ गाठले आणि फ्रेंडशिपचा तरी स्वीकार करावा अशी विचारणा प्राचीला केली. मात्र प्राचीने आकाशला नकार देताच विकास तिझ्याशी भांडण करू लागला आणि त्याने चाकू काढून तिच्या पोटात भोकसला.  तसंच तिच्या अंगावर सपासप वार केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

तो सपासप वार करत असताना रस्त्यावरते लोक बघ्याची भूमिका घेत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत