फ्लिपकार्टची ‘द बिग फ्रीडम सेल’ ची घोषणा

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी कंबर कसली आहे. अॅमेझॉनच्या फ्रीडम सेलला प्रत्युत्तर देत फ्लिपकार्टने ‘द बिग फ्रीडम सेल’ ची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा हा सेल १० ते १२ ऑगस्ट असणार आहे. 

७२ वा स्वातंत्र्यदिन म्हणून हा सेल ७२ तास सुरू राहणार आहे. या ७२ तासांत ग्राहकांना उत्पादनांवर ८० टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे. यात विविध ब्रँड्सच्या उत्पादनांवर भरपूर आकर्षक ऑफर्स आहेत. दर ८ तासांनंतर ब्लॉकबस्टर डील मिळणार आहे. सिटी बँकच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर १० टक्के कॅशबॅकचीही ऑफर आहे.

१० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून या सेलला सुरुवात होईल. १० ऑगस्टला रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ‘रश अवर’ मध्ये भारी सूट मिळणार आहे. तर प्रत्येक तासाला एक नवी डील अशा २४ तासांना २४ डीलची ऑफर ग्राहकांना दिली जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत