बँका राहणार तीन दिवस बंद

रायगड माझा

बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या, अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.

बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेचे व्यवहार करु शकणार नाहीत तसेच एटीएममध्येही पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील तर रविवारीही बँकांना सुट्टी असते. त्यामुळे ग्राहकांनी २५ जानेवारीपर्यंत सर्व व्हावहार करून घ्यावेत असे आवाहन बँकाच्यावतीने  करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत